पिंपरी चिंचवड शहरातील पाणी पुरवठा दोन दिवस बंद राहणार…

राजगुरूनगर ( पुणे ) : पिंपरी चिंचवड शहराचा आज (शनिवारी) आणि उद्या (रविवारी) पाणी पुरवठा दिवसभरासाठी बंद करण्यात करण्यात येणार आहे.

‘एमएसईडीसीएल’चा फिडर नादुरुस्त झाल्याने रावेत येथील अशुद्ध जल उपसा केंद्रातील विद्युत पुरवठा खंडित होऊन संपूर्ण पंपिंग बंद झाल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांना दोन दिवस पाणी पुरवठा होणार नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आज पाणी पुरवठा पूर्ण क्षमतेने होणार नाही. कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू राहणार आहे.

त्यामुळे आज आणि उद्या पिंपरी चिंचवडकरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here