पच्छिम विदर्भात पाणी टंचाईची भीषणता होणार कमी…जाणून घ्या जलसाठ्याची टक्केवारी

अमरावती – सद्या राज्यात तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे..पश्चिम विदर्भात देखील उन्हाचा पारा वाढतो आहे..त्यामुळे अनेक ठिकाणी गावांमध्ये पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे..पश्चिम विदर्भात लघु, मध्यम, व मोठे असे एकूण ५११ प्रकल्प आहेत..

मागील वर्षी मार्च महिन्यात जलसाठा ४८ टक्के होता..मात्र यंदा हा जलसाठा ४६ टक्क्यांवर आलाय..विदर्भातील सर्वात महत्वाचा आणि मोठा असलेल्या नलदमयंती म्हणजेच अप्पर वर्धा प्रकल्पात ६२.८५ टक्के जलसाठा आहे..मागील वर्षी हा जलसाठा ६५ टक्क्यांवर होता..त्यामुळे येत्या काळात अनेक गावांना पाणी टंचाईला सामोर जावं लागणार आहे..

पश्चिम विदर्भात एकूण ५११ प्रकल्प आहेत..यात एकूण ४६.०९% जलसाठा आहे..

मोठे ९ प्रकल्प आहेत.. यात ४९.८५% जलसाठा आहे..

मध्यम २५ प्रकल्प आहेत..यात ५८.४९% जलसाठा आहे..

लघु ४७७ प्रकल्प आहेत.. यात ३७.७२ % जलसाठा आहे..

ग्राफिक्स

पश्चिम विदर्भात एकूण ५११ प्रकल्प आहेत..लहान मोठ्या प्रकल्पात असलेला जलसाठा जिल्हानिहाय

अमरावती :- ५३.२५%
यवतमाळ :- ४५.६८%
अकोला :- ४४.२६%
वाशीम :- ३६.९३%
बुलढाणा :- ४२.२६%

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here