वाशीम | समृद्धी महामार्गावर सिलेन्डरचा स्फोट…सिलेंडर भरलेला ट्रक आणि सिमेंट मिक्सर जळून खाक…

वाशीम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या निर्माणाधीन कामावर गॅस कटरसाठी वापरण्यात येणाऱ्या सिलेन्डरचा स्फोट होऊन त्यामध्ये सिलेंडर भरलेला ट्रक आणि सिमेंट मिक्सर अशी दोन वाहनं जळून खाक झाल्याची घटना काल सायंकाळी घडली असल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते…

हि घटना वाशिम जिल्ह्यातील शेंन्दूरजना मोरे इथं घडली आहे. समृद्धी महामार्गाच्या निर्माणाधीन पुलाच्या वेंल्डीग चे काम करीत असतांना गॅस कटर साठी वापरण्यात येणाऱ्या सिलेन्डर चा स्फोट झाल्यानं सिलेंडर ने भरलेला ट्रक आणि जवळच उभा असलेला मिक्सर ट्रक ही दोन वाहनं जळून खाक झाली आहेत.

सूदैवाने यामध्ये कूठलीही जीवीतहानी झाली नाही मात्र वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.सिलिंडर भरलेल्या ट्रक मधील एका नंतर एक सिलेंडर चा स्फोट होत असतांना त्याचा आवाज परिसरातील 5 किलो मीटर पर्यंत येत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here