वाशीम | २६ मेपासून बँकांचे कामकाज सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत चालणार…

पवन राठी
वाशिम
दि. २३ जिल्ह्यात लॉकडाऊनचे सुधारित नियम लागू करण्यात आले असून सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व बँकांच्या कामकाजाच्या वेळेतही बदल करण्यात आला असून २६ मे २०२० पासून जिल्ह्यातील बँक कामकाजाचा कालावधी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत करण्यास जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी मंजुरी दिली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व बँकांच्या कामकाजाची वेळ सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आली होती.

मात्र, लॉकडाऊनच्या सुधारित नियमानुसार सर्व दुकाने व आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने ग्राहकांच्या सोयीसाठी बँकेच्या वेळत बदल करण्यात आला आहे.

राज्यस्तरीय बँक सल्लागार समितीच्या सूचनेनुसार बँक कामकाजाची वेळ सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत करण्याच्या जिल्हा अग्रणी बँकेच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी मंजुरी दिली असून २६ मेपासून जिल्ह्यातील सर्व बँका आता सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.महाव्हाईस न्युज करीता पवन राठी वाशिम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here