मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा…राज्यातील या भागातही असणार जोरदार पाऊस…

फोटो – सौजन्य tweeter

न्यूज डेस्क – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, मुंबई तसेच रायगड आणि रत्नागिरी येथे येत्या 24 तास मुसळधार पावसासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने सांगितले आहे की, शनिवारी मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात जोरदार ते अति मुसळधार पाऊस पडेल.

वृत्तसंस्था द वेदर channel वृत्तानुसार, महाराष्ट्रातील अन्य काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये मान्सूनचा पाऊस सुरूच आहे. शुक्रवारी राज्यात वीज कोसळल्याने 16 जणांचा मृत्यू झाला. बिहारमध्ये गुरुवारी अनेक भागात 30 जणांचा बळी गेला.

शुक्रवारी सकाळी 8.30 ते सायंकाळी 8.30 या दरम्यान मुंबईतील कोलाबाच्या हवामान कार्यालयामध्ये 161.4 मिमी पावसाची नोंद झाली. हवामान खात्याच्या सांताक्रूझ हवामान स्थानकात महानगरात त्या काळात 102.7 मिमी इतका मुसळधार पाऊस पडला. यापूर्वी विभागाने मुंबई आणि काही समुद्रकिनारी असलेल्या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता.

साभार – Weather Channel

पावसाने सुरूवात केल्याने मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे, परंतु पाणी साचल्यामुळे त्यांच्या अडचणीही वाढल्या आहेत. मुसळधार पावसामुळे हिंदमाता परिसरात पाणीच पाणी आहे. तसेच अन्य भागांतून पाणी साचण्याच्या समस्येविषयी बातम्याही प्राप्त होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here