“वखार आपल्या दारी, महामंडळाचे वचन शेतमालाचे संरक्षण अभियान” एक दिवसीय शेतकरी कार्यशाळा….

न्युज डेस्क – महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शेतमाल साठवणुकीच्या विविध योजनांचा लाभ थेट शेतक-यांना रहावा यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, कृषी विभाग व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित यांध्या संयुक्त विद्यमाने ‘वखार आपल्या दारी, महामंडळाचे वचन शेतमालाचे संरक्षण’ या अभियाना अंतर्गत शेतमाल तारण योजनेची शेतकऱ्यांना माहिती मिळावी या करिता दि. १७/११/२०२१ रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या अकोला(शिवणी) या वखार केंद्रावर करण्यात आलेले होते.

या कार्यक्रमाच्या निमित्याने महामंडळाची शेतकन्यांसाठी विशेष औनलाईन शेतमाल तारण कर्ज योजनेची माहिती देण्यात आली वखार महामंडळाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सहकार्याने पार शेतकरी ठेवीदारांना व शेतकरी उत्पादक कंपन्यांना गोदाम पावती वर नमूद साजून शेतमालाच्या मूल्यांकनाच्या ५०% कर्ज उपलब्ध करुन दिले जाते ठेवीदारांना प्रतक्ष्य कोणत्याही बँकेत न जाता कुठेही हेलपाटे न मारता गोदामातूनच ऑनलाईन अर्ज करून कर्ज मिळते.

शेतकऱ्यांना व शेतकरी उत्पादक कंपन्यांना ९% दराने शेतमाल तारण योजने अंतर्गत रु.५ लाखा पर्यत व शेतकरी उत्पादक कंपन्यांना रु. ५,००,००० लाखा पर्यंत शेतमाल कर्ज तारण रक्कम २४ तासामध्ये त्यांचा खात्या वर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून RTGS द्वारे वर्ग करण्यात येते. हि अभिनव शेतमाल तारण कर्ज योजना महाराष्ट्रातील सर्व वखार केंद्रावर गोदामा मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

आज मितेस ६०० पेक्षा जास्त शेतक-यांनी १५ कोटी पेक्षा जास्त कर्ज रक्कमेचे वितरण करण्यात आले आहे. असे साठा अधिक्ष्यक श्री.शंकर भोयर यांनी संगीतले. शेतकरी बांधवांनी सोयाबीन व इतर पिकांच्या सुगीच्या काळात जास्तीत जास्त आवक झाल्यामुळे शेतमालाचे बाजारभाव कमी होतात त्यामुळे सुगीचा काळात शेतमालाची विक्री न करता शेतमालाची साठवणूक वखार महामंडळाच्या गोदामात करावी असे आव्हान.

श्री. भाऊसाहेब टेमगर महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या वतीने केले व गोदाम बांधणीच्या सर्व शासकीय योजनांची माहिती दिली.सदरच्या कार्यशाळेस श्री.दादाराव देशमुख कृषी भूषण, श्री.भाऊसाहेब टेमगर सहकार विकास महामंडळाच्या गोदाम व्यवस्थापनाचे वरिष्ठ सल्लागार, श्री.एस.पी.भोयर साठ अधिक्षक अकोला(शिवणी),

श्री.एम.झांबरे व्यवसाय तंत्रज्ञान व्यवस्थापक मानवत, श्री.दीपक बोचरे शेतकरी उत्पादक कंपनी विवरा, श्री.सतीश पाटील सचिव वाशीटाकळी श्री.अश्विन अलाटे प्रत नियंत्रक ,श्री.संतोष दांदळे शेतकरी उत्पादक कंपनी पारस इत्यादी मार्गदर्शक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.अश्विन अलाटे प्रत नियंत्रक, अकोला(शिवणी) यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here