वर्धा | आर्वीच्या कदम रुग्णालयाचे धक्कादायक प्रकरण…Video

पोलिसांकडून तपास सुरु…डॉक्टर रेखा कदम यांच्या सासू आणि परिचारिकेलाही घेतले ताब्यात…अल्पवयीन मुलीचा गर्भपात प्रकरण

वर्धा – अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी पथक आणि पालिका पथकाला पाचारण करुन डॉ. रेखा कदम यांच्या रुग्णालयामागील परिसरात खोदकाम केले असता जमिनीत पुरलेले भ्रुण अवषेशांसह चआढळून आल्या.याप्रकारणी आता रुग्णालयाची परिचारिका संगीता काळे आणि डॉक्टरांची सासू संगीता काळे ही सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे.

स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. रेखा कदम यांनी अल्पवयीन मुलीचा ३० हजारात गर्भपात केल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी डॉ. रेखा कदमसह मुलाच्या आईवडिलांना अटक केली होती. कदम रुग्णालयाच्या मागील परिसरात खोदकाम केले असता भ्रुण अवशेष आणि काही हाडे आणि गर्भपिशवी आढळून आली. बुधवारी पुन्हा डॉ. कदम हिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने डॉ. रेखा कदम हिची कारागृहात रवानगी केली.

डीएनए टेस्टसाठी पाठविले अवशेषरुग्णालयामागील खड्डा बायोगॅस प्रकल्पाचा होता. मात्र, तो वापरात नसल्याने या खड््यात इतर वेस्टेज साहित्य टाकले जात होते. पंचांसमक्ष अनेक बाबी जप्त केल्या असून जप्त करण्यात आलेले अवशेष डीएनए टेस्टसाठी पाठविण्यात येणार आहे. तसेच हाडांचे अवशेष जनावरांचे की माणसांचे ही बाब अहवाल प्राप्त झाल्यावरच कळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here