पुणे येथील वानवाडी पोलिसांचे पथकाने यवतमाळ मध्ये दाखल…

यवतमाळ – सचिन येवले

पुणे येथील वानवाडी पोलिसांचे पथकाने यवतमाळ मध्ये दाखल झाले आहे पूजा चव्हाण नामक तरुणीने  यवतमाळ च्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचार घेतले का ? याबाबतचा तपास करण्यासाठी हे पथक आले आहे. 

रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ मिलिंद कांबळे यांना याबाबतचे पत्र सुद्धा पोलीस तपास पथकाने दिले असल्याची माहिती असून सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव याचे 4 जणांचे पथक असल्याची माहिती आहे त्यामुळे या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता तपासला वेग येणार आहे पूजा चव्हाण हिने येथे उपचार घेतले होते काय ?

केव्हा घेतले ? आदी विषयाची माहिती हे पथक घेणार असल्याची माहिती आहे विशेष म्हणजे हे पथक यवतमाळ दाखल झाल्यानंतर त्यांची डायरी नोंद यवतमाळ शहर पोलिसात त्यांनी दाखल केल्याने हे पथक यवतमाळ आल्याचे आता शिक्कामोर्तब झाले आहे.त्यामुळे आता तपासात काय बाबी पुढे येतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here