चेतन दही,तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात मध्ये पूर्णा गौतमा व विद्रुपा या तीन नद्यांचा संगम असलेल्या वांगेश्वर तीर्थक्षेत्र येथे दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरत असते परंतु आता कोरोना विषाणू पादुर्भाव मुळे येथील मंदिर काही दिवस बंद होते यात्रा सुद्धा रद्द करण्यात आली आहे.
शासनाने येथे गर्दी होऊनही म्हणून निर्बंध घातले आहेत त्यामुळे महाशिवरात्रीला उत्सव होऊ शकणार नाही तेल्हारा तालुक्यामध्ये वाडी वांगरगाव रस्त्यालगत असलेली श्री वांगेश्वर तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी महादेवाचे मंदिर आहे या ठिकाणी पूर्णा गौतमा व विद्रुपा तीन नद्यांचा संगम असल्यामुळे याठिकाणी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून अनेक भाविक भक्त महाशिवरात्रीला वांगेश्वर महादेव मंदिरात दर्शना करता येतात.
त्रंबकेश्वर मंदिरानंतर तीर्थक्षेत्र वांगेश्वर येथे नारायण नागबली पूजा केली जाते दरवर्षी महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते यावर्षी असल्यामुळे शासनाने निर्बंध घातल्यामुळे वांगेश्वर याठिकाणी यात्रा रद्द करण्यात आली असून महादेवाच्या मंदिरात केवळ दहाच भाविक उपस्थित राहण्याचे शासनाने तसेच आदेश निर्गमित केले आहेत व निर्बंध घातले आहेत याठिकाणी तेल्हारा पोलीस स्टेशनचा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे