पोलिसांचा छडा सुटला भटकलेल्या वृद्धांचा तिढा; चिचोली जंगलातील घटना…

लाखांदूर – नास्तिक लांडगे

सकाळच्या सुमारास जंगलात शेळ्या-बक-या चारावयास गेलेले दोन वृध्द एकमेकांच्या शोधात शेळ्या-बक-यांसह भटकून मध्यरात्रीपर्यंत घरी न आल्याने गावका-यात एकच खळबळ म्माजली.या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना होताच पोलीसांनी रात्री अंधारात तब्बल 10 किमी जंगल पिंजून काढत दोघांनाही शेळ्या-बक-यां सह जिवंत शोधल्याने पोलिसांचा छडा, सुटला भटकलेल्या वृद्धांचा तिढा एवढेच सबंध गावक-यांत बोलले जात आहे.

सदर घटना गत 9ऑक्टो.रोजी लाखांदूर तालुक्यातील चिचोली गावालगतच्या जंगल परिसरात घडली असुन दामोधर सिताराम कुरुडकर (60)व बलभिम बगा जंगम (65)रा.चिचोली अशी शेळ्या बक-यांसह भटकलेल्या वृद्धांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार घटनेच्या दिवशी घटनेतील दोन्ही वृद्ध नेहमीप्रमाणे गावालगतच्या जंगलात जवळपास 60ते 70शेळ्या बक-या चारावयास गेले होते.

यावेळी दोघेही शेळ्या-बक-या चारत असतांना अचानक बलभिमला घरी काम आल्याने काही वेळासाठी तो गावात येवून परत जंगलात गेला.मात्र यावेळी त्याला त्याचा साथीदार व शेळ्या-बक-या आढळून न आल्याने त्याने सबंधितांचा जंगलात शोध चालविला.एकमेकाचा शोध घेत असतांना दोघेही जंगलात भटकले.दरम्यान रात्री उशिरापर्यंत दोन्ही वृद्ध शेळ्या-बक-यांसह गावात न परतल्याने गावक-यात भितीचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेची माहिती येथील गावक-यांनी लाखांदूर पोलिसांना देताच येथील पोलीसांनी काही वनकर्मचा-यांसह 10-12 गावकरी तरुणांना सोबत घेऊन तब्बल 10किमी.पर्यंतचा संपूर्ण जंगल पिंजून काढल्यानंतर मध्यारात्री 1वा.चे सुमारास दोघेही दहेगाव च्या जंगल परिसरात आढळून आले.यावेळी पोलिस अधिकारी कर्मचा-यांसह गावक-यांनी शेळ्यांसह दोघांनाही चिचोली गावात सोडल्यानंतर सर्वत्र पोलिसांचा छडा,सुटला भटकलेल्या वृद्धांचा तिढा म्हणत सुटकेचा श्वास घेतला.

सदर कामगिरी लाखांदूरचे पोलिस निरिक्षक शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक प्रमोद करसुंगे,पोलिस शिपाई राहूल गायधने,मनिष चव्हाण,सुभाष शहारे,पो.हवा.गोपाल कोसरे, वन विभागाचे क्षेत्रसहाय्यक निर्वाण,पाटील यासह अन्य कर्मचारी व गावक-यांनी पार पाडली.या कामगिरीने लाखांदूर पोलिसांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here