दिग्रस बु परिसरातील निराधार पेन्शनचा प्रतिक्षेत, तिन महिन्यापासुन पेन्शनधारक वंचित…

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यातील दिग्रस बु परिसरात तुलन्गा,संगोळा, लावखेड, दिग्रस खुर्द येथील शेकडो निराधार व दिव्याग यांना मागील तीन महिन्यापासुन शासनाकडुन मिळणारे पेन्शन मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली असल्याचे तक्रारी वाढत असल्याचे चित्र आहे. या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी तथा शासनाने त्वरीत लक्ष देऊन पेंशन धारकांच्या खात्यात पेंशन वर्ग करण्याची मागणी येथील पेंशनधारक करीत आहेत.

यामधील वयोवृध्द असलेले पेंशन धारक दरमहा पेंशन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. ही समस्या गंभीर असुन या गंभीर समस्येकडे स्थानिक आमदार संबधित अधिकारी तहसिलदार यांनी लक्ष देण्याची मागणी येथील वयोवृध्द निराधार पेंशनधारक,दिव्यांग डोळयात अश्रु आणीत आमच्याकडे कुणी लक्ष देईल का ? अशी विचारणा करीत आहेत.

पुढील काही दिवसात दसरा व दिवाळी हे मोठे सण येत आहेत निराधारांचा दसरा व दिवाळी अंधारात जाणार नाही याची दक्षता घेऊन पेंशन धारकांना त्वरीत लाभ कसा देता येईल याबाबत खबरदारी घेऊन पेंशन देण्यात यावे अशी मागणी दिव्याग संदीप गवई,गोपाळ तळोकार,आशा तुकाराम गवई आदीकडून करण्यात आली आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here