पत्रकारीतेचे व्रत म्हणजे काटेरी मुकुट असतो, ती सेवा म्हणून स्विकारा रामनाथ ज-हाड…

औरंगाबाद – विजय हिवराळे

पत्रकारीतेचे व्रत म्हणजे काटेरी मुकुट असतो, पत्रकारिता प्रत्येकांनी सेवाधर्म म्हणून स्विकारा आपल्याला मिळालेल्या संधीचे समाज, राष्ट्र, देश हित सांभाळून सोने करा असा सल्ला पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष रामनाथ जऱ्हाड यांनी पत्रकारांना दिला.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून – अजिंठा येथे व्ह्यू पॉइंट येथे मंगळवार २६ जाने रोजी दुपारी पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांची मराठवाडा स्तरिय पत्रकाराचे स्नेह मिलन बैठक संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रामनाथ जऱ्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मराठवाडयाातुन पत्ररकर सेवा संघाचे पदाधिकारी हजर होते. सामाजीक उपक्रमातंर्गत पत्रकार व समाजिक कार्य या कार्यक्रमांमध्ये अजिंठा लेणी व्ह्यू पॉईंट परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. हा परिसर पत्रकारांनी हातात झाडू घेऊन संपूर्ण परिसर झाडून घाण, कचरा, पडलेली लिंबाची पाने, डजबिन मध्ये टाकून परिसर स्वच्छ केला.लॉक डाऊन मध्ये अजिंठा लेणी ही नऊ महिने बंद असल्यामुळे येथे घाणीचे साम्राज्य पसरले होते.

मंगळवार २६ जानेेवारी रोजी झालेल्या पत्रकार सेवा संघटनेच्या मराठवाडा स्तरिय स्नेह मिलन बैठकीत पत्रकारांनी ग्रामिण पत्रकारांना येणाऱ्या अडचणीवर चर्चा केली . ग्रामिण पत्रकाारांना वृत्त संकलना पासून छापून आलेल्या परिणामाणा सामोरे जावे लागते हे अनेकांंनी बोलुन दाखले.

त्यासाठी संघटनेेच्या माध्यमातुन एक संघ रहाणे काळाची गरज आहे. हे मत काही नी व्यक्त केले. बैठकीत पत्रकार सेवा संघटनेच्यावतीने पत्रकारांना आपला विविध पदाचे सुत्रे सोपविण्यात आले यावेळी मरााठवाडा अध्यक्ष म्हणून सुनिल वैद्य, मराठवाडा उपाध्ययक्ष म्हणून दादासाहेब काळे यांच्या सह अनेकांची निवड जाहिर करत त्याचा संघटनेच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी सुनील वैद्य, रवींद्र सुरडकर, मराठवाडा महासचिव गणेश कोलते, दादासाहेब काळे, मोहसीन शेख, अरुण चव्हाण ,नदीम शेख, प्रवीण ढाकरे,योगेश शेळके, शंकर मानकर सह आदी पत्रकार उपस्थित होते . यावेळी कार्ययक्रमाचे सत्र संचलन दादासाहेब काळे यांनी तर आभार गणेश कोलते यांनी व्यक्त केले .यानंतर सर्वांनी वन भोजनाचा स्वाद घेतला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here