मतदार यादीचा विशेष पुनिरीक्षण मोहीमेचा लाभ नागरिकांनी घेण्याचे जिल्हाधिकारी चे आव्हान…

गोंदिया – अमरदिप बडगे

भारत निवडणूक आयोगाने 4 आगष्ट 2021 पत्रानुसार 1जानेवारी 2022 या दिनाकावर आधारित छायाचित्रसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुननिरिक्षण कार्यक्रम घोषित झाला आहे.1 नोव्हेबर 2022 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून ग्राम विकास विभागाचे परिपत्रकानुसार 25 आक्टोबर 2021 ते 16 नोव्हेंबर 2021 जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायत मध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुननिरिक्षण कार्यक्रमासाठी विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत.

ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार 16नोव्हेबर 2021 रोजी गोंदिया जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायत मध्ये एका विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात येणार असून या कार्यक्रमा अंतर्गत नागरिकांनी मतदार यादीतील त्याची नावाची नोंद तपासणी करावे.

1जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण करणारे नविन मतदार जे आहेत त्यांनी नमुना 6 मध्ये विशेष ग्राम सभेच्या दिवशी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा NVSP या पोर्टलवर लॉगीन करून संबंधित अर्ज आँनलाईन पध्दतीने सादर करावा . विशेष ग्राम सभा मोहीम लाभ घ्यावा.असे आव्हान गोंदिया जिल्ह्यधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here