विसोरा येथील कोट्यवधी चा निधी खर्च करून बांधलेले एस.आर.पी.एफ १३ चे कार्यालय व निवासस्थान जिल्ह्यासाठी ठरत आहे पांढरा हत्ती…

गडचिरोली – मिलिंद खोंड

गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने नक्षल कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी 1994 साली राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13 स्थापना करण्यात आली.ह्याचे मुख्यालय जिल्ह्यातील विसोरा ता.वडसा या ठिकाणीं देण्यात आले.

स्थापन करते वेळी गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दलाची सुरक्षा ,दळणवळण, व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने उपयुक्त शासकीय जागा उपलब्ध नसल्याने नागपूर येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक.4 च्या परिसरात गट क्रमांक 13 गडचिरोली समाँदेशक कार्यालय व अधिकारी,कर्मचार्यांची तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्यात आली.

त्यानंतर शासनाने या गट क्रमांक.13साठी जिल्ह्यातील विसोरा येथे समादेशक कार्यालय व कर्मचारी निवासस्थानासाठी शासकीय जागा उपलब्ध करून दिली.त्या ठिकाणी समादेशक कार्यालय व पहिल्या टप्प्यातील 84 अधिकारी-व कर्मचाऱ्याची निवासस्थानाचे काम पूर्ण झाले आहे.

या ठिकाणी मंजूर 7 कंपन्यांपैकी 1 कंपनी वास्तव्यास आहे.परंतु पोलीस गटाची संचालन व्यवस्था सांभाळणारे समादेशक कार्यालय अजून पर्यत स्थानांतरीत झालेले नाही.या गटाचा कारभार नागपूर वरूनच सुरू असल्याने बांधकाम झालेले समादेशक कार्यालय व निवासस्थान जिल्ह्यासाठी “पांढरा हत्ती “ठरत आहे.

गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक रचना व नक्षलवाद्यांचा कारवाया, सुव्यवस्था चा विचार करता जिल्हात कार्यरत अन्य पोलीस दलांसोबत तातडीने समनव्य साधून पोलिसांची वेळीच हालचाल होणे गरजेचे असते त्यामुळे संपुर्ण गटाला निर्देश देणारे समाँदेशक अधिकारी यांचे पोलीस बल गटाच्या मुख्यालयी असणे अत्यंत आवश्यक असते.

त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षली कारवायांची गंभीरता लक्षात घेता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13 चे समादेशक कार्यालय नागपूर येथुन विसोरा येथे मुख्यालयी हलविणे गरजेचे आहे.नागपूर येथे समादेशक कार्यालय असल्याने अनेकदा गरजेच्या वेळी इतर पोलीस दलासोबत समनव्य साधण्यात अडचण येते.

विसोरा नजीक वडसा हे तालुका मुख्यालय असल्याने या ठिकाणी मोठी बाजारपेठ, रेल्वे, नगरपालिका व मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध असल्याने समनव्य साधण्यासाठी व दळणवळण करण्यासाठी विपुल प्रमाँणात साधने उपलब्ध आहेत.त्यामुळे समादेशक कार्यालय विसोरा येथे मुख्यालयी हलविण्यास कोणाचा अडसर ठरत आहे??याचा शासनाने शोध घेणे आवश्यक आहे.

या संदर्भात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी नागपूर येथिल समादेशक कार्यालय विसोरा ता.वडसा येथील मुख्यालयी स्थानंतरन करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस महासंचालक ,अपर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल मुंबई,पोलीस उप.महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल नागपूर यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.

त्यामुळे त्यांच्या पत्रव्यवहाराची शासन ,प्रशासन दखल घेऊन नागपूर येथील राज्य राखीव पोलीस दल गट क्र.13 चे समादेशक कार्यालय विसोरा येथे आणण्यासाठी काय पाऊले उचलतात याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here