IPL 2020 | SRH vs RCB विराट च्या बंगळुरूने मारली बाजी…हैदराबादला १० धावांनी पराभूत केले…

न्यूज डेस्क -इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्राचा तिसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू RCB आणि सनरायझर्स हैदराबाद SRH यांच्यात खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने विराट कोहलीच्या नेतृत्वात बाजी मारत सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 10 धावांनी विजय मिळविला आहे.

एका क्षणाला हातातून गमावलेला सामना बंगळुरुने १० धावांनी जिंकला. युजवेंद्र चहलने एकाच षटकात जॉनी बेअरस्टो आणि विजय शंकरला माघारी धाडत बंगळुरुच्या विजयाची पायाभरणी केली. हैदराबादकडून बेअस्टोने धडाकेबाज अर्धशतक झळकावलं, पण त्याची खेळी व्यर्थ गेली.

सलामीवीर देवदत पडीकल आणि फिंच यांनी पहिल्या विकेटसाठी केलेल्या ९० धावांच्या भागीदारीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिल्या सामन्यात १६३ धावा केल्या आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा डेव्हिड वॉर्नरचा निर्णय काहीसा फसला.

पदार्पणाचा आयपीएल सामना खेळणाऱ्या देवदत पडीकलने फिंचच्या साथीने हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पडीकलने पहिल्याच सामन्यात अर्धशतकी खेळी करत संघाला चांगली सुरुवात दिली.

परंतू सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर RCB च्या मधल्या फळीने निराशा केल्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पडीकल आणि डिव्हीलियर्स यांनी सामन्यात अर्धशतकं झळकावली.

दुसऱ्या बाजूने डिव्हीलियर्सने अखेरपर्यंत मैदानात तळ ठोकून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. शिवम दुबेने त्याला चांगली साथ दिली. डिव्हीलियर्सने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत फटकेबाजी करुन आपलं अर्धशतक साजरं केलं.

त्याने ५१ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात चोरटी धाव घेताना तो धावबाद झाला. हैदराबादकडून विजय शंकर, अभिषेक शर्मा आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

ROYAL CHALLENGERS BANGALORE INNINGS (RUN RATE: 8.15)

BatsmenRunsBallsSR4s6s
Devdutt Padikkalb Vijay Shankar5642133.3380
Aaron Finchlbw Abhishek Sharma2927107.4012
Virat Kohlic Rashid Khan b T Natarajan1413107.6900
AB de Villiersrun out (Manish Pandey)5130170.0042
Shivam Duberun out (Jonny Bairstow)7887.5000
Josh PhilippeNOT OUT1250.0000
EXTRAS(nb 2, w 2, b 0, lb 1, pen 0)5
TOTAL(5 wickets; 20 overs)163

DID NOT BAT:

BowlerORWEconDots
Bhuvneshwar Kumar42506.2511
Sandeep Sharma43609.007
T Natarajan43418.506
Mitchell Marsh0.4609.001
Vijay Shankar1.214110.504
Rashid Khan43107.754
Abhishek Sharma21618.002

FALL OF WICKETS

 • 1-90 (Padikkal, 10.6 ov) ,
 • 2-90 (Finch, 11.1 ov) ,
 • 3-123 (Kohli, 15.5 ov) ,
 • 4-162 (de Villiers, 19.3 ov) ,
 • 5-163 (Dube, 19.6 ov)

SUNRISERS HYDERABAD INNINGS (RUN RATE: 7.77)

BatsmenRunsBallsSR4s6s
David Warnerrun out (Umesh Yadav)66100.0010
Jonny Bairstowb Yuzvendra Chahal6143141.8662
Manish Pandeyc Navdeep Saini b Yuzvendra Chahal3433103.0331
Priyam Gargb Shivam Dube121392.3010
Vijay Shankarb Yuzvendra Chahal010.0000
Abhishek Sharmarun out (Umesh Yadav)74175.0010
Rashid Khanb Navdeep Saini65120.0010
Bhuvneshwar Kumarb Navdeep Saini020.0000
Sandeep Sharmac Virat Kohli b Dale Steyn96150.0010
Mitchell Marshc Virat Kohli b Shivam Dube010.0000
T NatarajanNOT OUT3475.0000
EXTRAS(nb 0, w 8, b 5, lb 2, pen 0)15
TOTAL(All out; 19.4 overs)153
BowlerORWEconDots
Dale Steyn3.43319.009
Umesh Yadav448012.008
Navdeep Saini42526.259
Washington Sundar1707.004
Yuzvendra Chahal41834.5011
Shivam Dube31525.007

FALL OF WICKETS

 • 1-18 (Warner, 1.4 ov) ,
 • 2-89 (Pandey, 11.6 ov) ,
 • 3-121 (Bairstow, 15.2 ov) ,
 • 4-121 (Shankar, 15.3 ov) ,
 • 5-129 (Garg, 16.3 ov) ,
 • 6-135 (Sharma, 16.6 ov) ,
 • 7-141 (Kumar, 17.4 ov) ,
 • 8-142 (Khan, 17.6 ov) ,
 • 9-143 (Marsh, 18.2 ov) ,
 • 10-153 (Sharma, 19.4 ov)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here