IPL 2020 कालच्या सामन्यात विराटला १२ लाखांचा पडला दंड…जाणून घ्या कारण…

न्यूज डेस्क – कालचा दिवस विराट कोहलीसाठी खूपच वाईट दिवस होता काल पंजाब सोबत झालेल्या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यात क्षेत्ररक्षण करताना केएल राहुल ला दोन झेल सोडलेत त्यामुळे राहुल ला दोनदा जीवदान मिळाले ,यानंतर पंजाबच्या राहुलने धडाकेबाज फलंदाजी करत आरसीबीच्या गोलंदाजांची पिसे काढली.

क्षेत्ररक्षण करत असताना षटकांची गती कायम न राखल्याप्रकरणी आरसीबी संघाचा कर्णधार विराट कोहलीला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या नियामानुसार आरसीबीच्या संघाची ही पहिली चूक होती. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीला १२ लाख रुपयांच दंड करण्यात आला.

सामन्यानंतर बोलताना विराट कोहली म्हणाला, “पहिल्या १५ षटकांच्या खेळापर्यंत आम्ही चांगल्या स्थितीत होतो. पण त्यानंतर जे काही झालं त्यामुळे आम्ही पराभूत झालो. सर्वांसमोर उभं राहून मला या पराभवाची जबाबदारी घ्यावीच लागेल.

माझ्या चुकीमुळे आमचं आव्हान ३५ ते ४० धावांनी वाढलं. नाहीतर आम्ही पंजाबला १८० पर्यंत रोखू शकलो असतो आणि मग आमच्या फलंदाजीच्या वेळी पहिल्या चेंडूपासूनच आमच्यावर दडपण वाढलं नसतं.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here