विराट कोहली हुबेहूब करतोय शिखर धवनच्या स्टाईलची कॉपी…व्हिडिओ व्हायरल…

फोटो- Video स्क्रीन शॉट

न्यूज डेस्क – सध्या टी -20 विश्वचषक भारताबाहेर खेळला जात आहे. सर्व टीम विश्वचषकाच्या शेड्यूल मध्ये व्यस्त असतानाही इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो शिखर धवनच्या फलंदाजीची शैलीची कॉपी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना विराटने धवनलाही टॅग केले आहे.

भारतीय क्रिकेट संघाने टी -20 विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) नेतृत्वाखाली संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि ओमानमध्ये टी -20 विश्वचषक खेळला जात आहे. विराटचा धवनचे अनुकरण करणारा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. विराटची कर्णधार म्हणून ही शेवटची आयसीसी टी -20 स्पर्धा असेल. विराटने टी -20 विश्वचषकाआधीच जाहीर केले आहे की या स्पर्धेनंतर तो टी -20 फॉरमॅटच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे.

याशिवाय विराटने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) चे कर्णधारपदही सोडले आहे. IPL 2021 हा विराटचा RCB कर्णधार म्हणून शेवटचा हंगाम होता. शिखर धवनबद्दल बोलायचे झाले तर त्याने आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी चमकदार कामगिरी केली, पण सध्या टी -20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा भाग नाही. टी -20 विश्वचषकात भारताला आज इंग्लंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळायचा आहे. टीम इंडिया 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने टी -20 वर्ल्ड कपमध्ये आपला सामन्यापासून सुरुवात करणार.

पाहा व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here