अमरावतीमध्ये बंददरम्यान हिंसाचार… नवाब मलिक म्हणाले- दोषींवर कारवाई करणार…

फोटो- video स्क्रीन शॉट

अमरावती – त्रिपुरामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात महाराष्ट्रातील अमरावती येथे निदर्शने करण्यात येत आहेत. काल काही संघटनांनी केलेल्या निदर्शनादरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी दुकानांवर दगडफेक केल्याने परिसरातील अनेक भागात तणाव निर्माण झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज भाजपने बंद पुकारला आहे. बंददरम्यान हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दोषींवर कारवाई करण्याचे वक्तव्य केले आहे.

त्रिपुरातील जातीय दंगलीच्या निषेधार्थ काल महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये मुस्लिम संघटनांनी बंदची घोषणा केली होती. यादरम्यान काही ठिकाणांहून हिंसाचाराच्या बातम्या आल्या. नांदेडमध्ये हिंसक जमावाने अनेक दुकानांची तोडफोड केली आणि जोरदार दगडफेक केली, ज्यात 2 पोलीस जखमी झाले. निदर्शनादरम्यान सरकारी वाहनांची तोडफोड करण्यात आली. मालेगावातही बराच गदारोळ झाला. हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

हिंसाचाराबद्दल मंत्री नवाब मलिक म्हणाले की, घडलेली घटना दुर्दैवी आहे. पोलिस त्याची चौकशी करणार आहेत. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण आंदोलनाच्या नावाखाली हिंसा करणे योग्य नाही. आम्ही लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here