पातूर चे विनय बगडेकर यांनी साकारली विठूराया गोरोबा काका चि कलाकृती…

निशांत गवई

पातूर : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. कर्मयोगी संतांनी आध्यात्मिक कार्यासह सामाजिक उत्थानाचेही कार्य केले आहे . या संतांच्या महान परंपरेला उजाळा देणारा यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी दिल्लीच्या राजपथावर महाराष्ट्रातल्या संत परंपरेवर आधारित चित्ररथ असणार आहे .

राजपथावर यावेळी दिसणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक समोर आली असून , या चित्ररथात वैदर्भीय कलावंतांनी घडविला राज्याचा चित्ररथ अकोला जिल्ह्यातील पातूरचे शिल्पकार विनय शामलाल बगळेकर यांनी कोट्यवधी भक्तांचे आराध्य दैवत वितुरापांसह संत गोरोबाकाका , संत जनाबाई पांचे पुतळे साकारले आहेत

. पंदा दिल्लीच्या राजपथावर जिल्ह्यातील पातूरसह अमरावती , पवतमाळ , नागपूर अशा वैदर्भीष शिल्पकाराची कलाकृती यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे . या चित्ररथाच्या प्रारंभी वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची ८ फुटांची आसनस्थ मूर्ती आहे . त्यांच्या मूर्तीसमोर ज्ञानेश्वरी गंध दर्शविण्यात आला आहे .

चित्ररथाच्या मध्यभागी भक्ती आणि शक्तीचा संदेश देणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कटस असणारे संत तुकाराम महाराज यांची भेट दर्शविणारे प्रत्येकी ८ फूट उंचीचे दोन पुतळे उभारण्यात आले आहेत . यापाठोपाठ राज्यातील संतांचे व कोट्यवधी भक्तांचे दैवत असणाऱ्या पांडुरंगाची कटेवर हात असणारी सुमारे साडेआठ फूट उंचीची लोभस मूर्ती उभारण्यात आली आहे .

चित्ररथाच्या शेवटच्या भागात ८ फूट उचीचा संतवाणी हा ग्रंथ उभारण्यात आला आहे व यावर संतांची वचने लिहिण्यात आली आहेत . या चित्ररथातील पुतळ्यांची बांधणी पूर्ण झाली असून , पातूरचे शिल्पकार विनय बगळेकर यांनी प्रमुख पुतळ्याची निर्मिती केली आहे .

दिल्लीच्या राजपथवर मंगळवारी होणाऱ्या पथसंचलनात राज्याचा चित्ररथ प्रमुख आकर्षण उरणार असून , चित्ररथाच्या दोन्ही बाजूस संत जनाबाई , संत कान्होपात्रा , संत नामदेव , संत शेख , संत नरहरी , संत सावता , संत दामाजीपंत , संत गोरोबा , संत एकनाथ , संत सेना , संत चोखामेळा पांच्या प्रतिकृती असणार आहेत .


विनय शामलाल बगळेकरांची कलाकृती दिल्लीत ! फायवर आणि पंचधातूंचे पुतळे घडविणारे पातूरचे शिल्पकार आर्टिस्ट विनय वगळेकर यांचे राज्याच्या चित्ररथात मोठे योगदान आहे . वगळेकर यांनी खामगावातून कल्चर पूर्ण केले असून , याचे मुख्य सेन्टर मुंबईचे जेजे स्कूल ऑफ आर्ट होते . विनय यांनी छत्रपती शिवराय , संत गोरोबाकाका यांच्या पुतळ्यासह संत चोखोवा आणि संत जनाबाई यांचे पुतळे मुव्हिंग ‘ आहेत .

पातूरच्या वगळेकरांसहयवतमाळचे प्रवीण पिल्लारे , अमरावतीचे शिवप्रसाद प्रजापती यांनीही तीन फिरते शिल्प साकारले आहेत . या चित्ररथात सहभागी अन्य सहकलावंतांमध्ये आकाश , भूषण , सचिन मने या वैदर्भीयांचाही सहभाग आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here