दिल्लीपेक्षा गल्लीत गोंधळ जास्त…! गाव पुढारी निवडणुकीत व्यस्त…!जनतेच्या मूलभूत समस्यांकडे मात्र दुर्लक्ष…!

बुलढाणा – अभिमान शिरसाट

गावची मिनी विधानसभा असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वारे सर्वदूर वाहत असून प्रचाराने वेग धरला आहे गावातील सर्व पुढारी कार्यकर्ते आपली सर्व शक्ती तथा युक्ती पणाला लावून पॅनल तथा आपला उमेदवार विजय करून आपले अस्तित्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहे.

परंतु या सर्व पुढारी तथा कार्यकर्त्यांचे मात्र गावातील जनतेच्या ज्या मूलभूत सोई सुविधा समस्या जसे की पिण्याचे पाणी, रस्ते, नाली सफाई ,सांडपाण्याचे नियोजन इत्यादी समस्यांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

आपण रहात असलेल्या लोकशाहीप्रधान देशात निवडणूक आली की निवडणूक रिंगणात असलेल्या सर्वच उमेदवाराकडून मतदारावर तथा गोरगरीब जनतेवर आश्वासनाची बरसात केली जाते आणि निवडणूक संपतात जनतेला दिलेल्या विकास कामाविषयीच्या आश्वासनांचा मात्र निवडून आलेल्या प्रतिनिधींना विसर पडतो ही मोठी शोकांतिका आहे.

आणि या सर्व घटनेचा बारकाईने ,गांभीर्याने विचार केला असता दिल्लीपेक्षा गल्लीत गोंधळ जास्त …..!गाव पुढारी मात्र निवडणुकीत व्यस्त ……!आणि जनतेच्या मूलभूत समस्यांकडे मात्र दुर्लक्ष….! असे चित्र पहावयास मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here