टर्री चित्रपटाचे निर्माते विक्रम धाकतोडे अटकेत…

मुंबई – गणेश तळेकर

न्यूज डेस्क – मराठी चित्रपट सृष्टीत फार कमी काळात आपले स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेता अमोल कागणे यांना विक्रम धाकतोडे यांनी ३० लाखांचा गंडा घालून फसवणूक करण्यात आली असल्याची तक्रार दाखल असून या प्रकरणी विक्रम यांना अटक केली आहे.

चित्रपट व्यवसायात सहभागी करून घेण्याचे आदेश दाखवून निर्माता अमोल कागणे ला २९ लाख ५५ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी मंगळवार दि.१२ हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी विक्रम यांना हिंजवडी पोलीस यांनी ताब्यात घेतलय.या प्रकरणी निर्माता अमोल लक्ष्मण कागणे २९ रा.जांभूळकर चौक,वानवडी पुणे यानी फरियाद दिली असून आरोपी विक्रम धाकतोडे ३८ यांच्याविरोधात गुह्ना दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अमोल कागणे हे चित्रपट निर्माते असून ‘हलाल, लेथ जोशी वाजवूया ब्यांड बाजा ,परफ्युम ,बेफाम या चित्रपटाची निर्मिती तसेच चित्रपट विक्रीचा व्यवसायही करतात .तर आरोपी विक्रम धाकतोडे चित्रपट विक्रीसाठी मध्यस्थी करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here