विकास मंचच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात, पहिल्या टप्प्यात एक हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट…!

तेल्हारा – गोकुळ हिंगणकर

तेल्हारा स्थानिक अग्रेसन महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण व अभिवादन करून तेल्हारा विकास मंचच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आलीअसून पहिल्या टप्प्यात एक हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

समाजातील प्रत्येक घटकासह अठरा पगळ जाती व बारा बलुतेदारांना सोबत घेऊन जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी व निगरगट्ट बनलेल्या शासन प्रशासनाला जागे करण्याकरीता तेल्हारा विकास मंचची स्थापना करण्यात आली आहे . संघटनेची व्याप्ती वाढविण्याच्या दृस्टिने तेल्हारा विकास मंच सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सुरेश मंत्री ,प्रवीण पोहरकार, श्याम जिंदे, मोहन श्रीवास सोनू सोनटक्के यांची सदस्य नोंदणीची पावती फाडून सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली.

या वेळी मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर , स्वप्निल सूरे , संतोष राठी ,शे. ताजुद्दीन , अमोल आकोटकार,भावेश सायानी , मंगेश मामनकार , निलेश मानकर , नीलेश धारपवार, नितिन मानकर , एजाज शहा, राजेश गायकवाड़ , पिंटू वाडेकर अक्षय ठाकूर पवन झापर्डे गणेश इंगळे रवी येवले, राहुल देशमुख प्रफुल देशमुख बजरंग गव्हाणे राज खारोडे सुनील गोल्हर आकाश श्रीवास विठ्ठल ठाकरे शिवा राऊत दीपक भगत गोवर्धन पवार दादू दामोदर नवल वाणे पंकज वानखडे उदय पडस्कार आकाश तुंबळे,

मंगेश रत्नपारखी अमोल माहोरे पवन तायडे परिक्षित बोदळे गणेश काजळे जगदेव सोळंके अनिल गोल्लर, गणेश मोकळकार आकाश मुरकुटे कृष्णा सोनटक्के इत्यादि तेल्हारा विकास मंचचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here