महाराष्ट्रातील कलावंतांसाठी धडपड करणारी, कलाकारांना मदत करणारी, कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारी,. कलानगरी वेलफेअर सोसायटी अमरावती.या संस्थेचे वतीने अभिनेते विजय खंडारे यांचा भव्य सत्कार करण्यात आले अध्यक्ष कला नगरी वेलफेअर सोसायटी अमरावती च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हा सत्कार सोहळा पार पडला.
शून्यातून विश्व निर्माण करणारे विजय खंडारे अर्थातच पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाणं मराठीत रिमेक करणारे, प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणारे; अभिनेते खंडारे यांच्या गण्याला सुप्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन व सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंडाला यांनी सुद्धा प्रशंसा केली.
असे युवा अभिनेते विजय खंडारे यांचा सत्कार सोहळा ज्येष्ठ अभिनेते सुधीर पेंडसे अभिनेत्री सुषमा कोठेकर व डॉ ररूपेश खडसे मंदा राऊत चरणदास इंगोले व दिग्दर्शक सागर भोगे व कलानगरी वेलफेअर सोसायटीच्या संपूर्ण पदाधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाला.
