शेतकरी, शेतमजूर व विद्युत ग्राहक यांचे कोरोना काळातील वीजबिल, तसेच 200 युनिट पर्यत वीजबिल मुक्ती करण्यात यावी आणि वीजबिल कट करण्यात येऊ नये म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मूर्तिजापूर विद्युत कार्यालयाला घेराव करण्यात आला,
असता विद्युत विभागाचे अभियंता साहेब हे आंदोलकासमोर येऊन त्यांनी आंदोलकांच्या समस्या जाणून घेऊन निवेदन स्वीकारले आणि लगेच आंदोलकांच्या मागण्या शासनाला पाठवून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो असे आश्वासन दिले असता आंदोलकांनी समाधान व्यक्त केले.
आंदोलनाचे नेतृत्व सुरेश भाऊ जोगळे जिल्ह्या अध्यक्ष, अरविंद भाऊ तायडे मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष, गुलाबराव मसाये शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष, पंकज भाऊ वानखडे अध्यक्ष युवा शेतकरी संघटना.