नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला…विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी दिसणार एकत्र

न्युज डेस्क- बॉलिवूडमध्ये रोज नवनवीन चित्रपटांची घोषणा होत असते. आता आणखी एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे ज्यात कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर विकी कौशलसोबत दिसणार आहेत. ‘गोविंदा नाम मेरा’ असे या चित्रपटाचे नाव असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान करणार आहे. हा चित्रपट एक फॅमिली कॉमेडी ड्रामा चित्रपट असेल आणि करण जोहर याची निर्मिती करणार आहे.

शशांक खेतानने यापूर्वी करण जोहरसोबत ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ आणि ‘धडक’ सारखे चित्रपट केले आहेत. करण जोहरने सोशल मीडियावर चित्रपटाचे 3 पोस्टर शेअर करून चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात विकी कौशल नायक ‘गोविंदा वाघमारे’च्या भूमिकेत दिसणार आहे. भूमी पेडणेकर ही वाघमारेच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे तर कियारा अडवाणी वाघमारेच्या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसणार आहे.
पहा करण जोहरच्या पोस्ट:

हा चित्रपट 10 जून 2022 रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच त्याचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. या चित्रपटाशिवाय विकी कौशल सॅम माणेकशॉच्या बायोपिक ‘सॅम बहादूर’मध्ये, तर भूमी पेडणेकर ‘बधाई दो’मध्ये राजकुमार राव बरोबर आणि कियारा अडवाणीसोबत ‘भूल भुलैया 2’ आणि ‘जुग जुग जियो’ मध्ये दिसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here