HomeराजकीयVibhakar Shastri | लालबहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनी काँग्रेस पक्षाचा...

Vibhakar Shastri | लालबहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देवून केला भाजपमध्ये प्रवेश…

Share

Vibhakar Shastri : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याचे सत्र सुरूच आहे. तर आज माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. विभाकर यांनी आजच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्विट करून त्यांनी राजीनामा जाहीर केला. विभाकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपण पक्षाच्या प्राधान्य सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बुधवारी दुपारीच ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

विभाकर शास्त्री यांनी ट्विट केले की, ‘आदरणीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जी, मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.’ काही महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका होत असताना विभाकर शास्त्री यांनी राजीनामा दिला आहे. सोमवारीच महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: