बेलदा येथे पशुरोग निदान व चिकित्सा शिबीर सपन्न…

५० शेतकऱ्यांना भाजी बीयाण्यांचे वाटप तर २०० पेक्षा जास्त जनावरांना लसीकरण व उपचार करण्यात आले…

देवलापार – पुरुषोत्तम डडमल

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, दुधबर्डी ता. कळमेश्वर जि . नागपूर आणि पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण वाटिका अभियाना अंतर्गत इफको द्वारा प्रायोजित भाजी बीयाणे वाटप आणि पशुरोग निदान व चिकित्सा शिबिराचे आयोजन पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी१, हिवरा बाजार अंतर्गत मौजा बेलदा येथे दि १७ सप्टेंबर २१ रोजी करण्यात आले.

सदर कार्यक्रमात ५० शेतकऱ्यांना भाजी बीयाण्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी बेलदा गावातील २०० पेक्षा जास्त जनावरांना लसीकरण आणि उपचार करण्यात आले. डॉ सारीपुत लांडगे, वरिष्ठ वैज्ञानिक तथा प्रमुख यांनी जनावरांचे व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले.इफको चे राहुल नखाते यांनी नॅनो यूरिया बद्दल मार्गदर्शन केले. पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी डॉ अश्विनी गडमडे यांनी पशुआरोग्याबद्दल मार्गदर्शन केले.

पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ हिवरा बाजार येथील पशुधन विकास अधिकारी डॉ प्रिती सिरसाट यांनी विभागातील विविध योजनांबद्दल माहिती दिली. बेलदा गावचे सरपंच उमेश भांडारकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य केले आणि ग्रामस्थांना प्रोत्साहित केले.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचलानालाय येथे कार्यरत तांत्रिक अधिकारी डॉ.प्रज्ञेय ताकसांडे यांनी पशुपालकांना आहार विषयक मार्गदर्शन केले व या कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाचे सहकार्य केले.डॉ अनिल भिकाने,संचालक,विस्तार शिक्षण,

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर,डॉ सोमकुवर,सहयोगी अधिष्ठाता,नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय,नागपूर आणि श्रीमती शांताबाई कुमरे जि.प.सदस्या यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले होतेे.तसेच या।पशुरोग शिबिराकरिता वीरबॅक कंपनीच्या वतीने औषधी उपलब्ध करून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here