ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक मनोज पंडित यांचे निधन…

मनोर – पालघर तालुक्याच्या बोईसर परिसरातील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक मनोज कृष्णकुमार पंडित (वय.53) यांचे रविवारी (ता13) निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, आई, एक मुलगा,एक मुलगी आणि जावई असा परिवार आहे.

काही दिवसापूर्वी मनोज पंडित यांना कोरोनाची लागण झाली होती.कोरोना वर मात करून घरी आल्यानंतर त्यानं पुन्हा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना वसईच्या कृष्णा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.परंतु रविवारी त्यांचे उपचारा दरम्यान निधन झाले.

पत्रकारिते सोबत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या बोईसर तारापूर शाखेचे संस्थापक आणि उपाध्यक्ष होते. पक्षी निरीक्षणाचा छन्द असल्याने पक्षीनिरीक्षणासाठी त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या होत्या.

त्यांनी कॅमेऱ्यात टिपलेले पक्षाचे फोटो लक्ष वेधून घेत असत.मनोज पंडित यांच्या निधनाने एकपत्रकार, साहित्यिक आणि पक्षी निरीक्षक हरपल्याची भावना बोईसर परिसरात व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here