पातुर शिवसेना शहर च्या वतीने वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

पातुर – निशांत गवई

शिवसेनेचे संस्थापक शिवसेनाप्रमुख सरसेनापती वंदनीय हिंदुरुदय सम्राट अवघ्या शिवसैनिकांचे प्रेरणास्थान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पातुर शहर शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली व या मध्ये जुने बस स्टॅन्ड शिवभोजन येथे गोरगरीब लोकांना जेवण वाटप करण्यात आले,

सायंकाळी सहा वाजता पासून जुने बस स्टॅन्ड येथ शिव भोजन येथे ग्राम पंचायत शिरला सरपंच अर्चना सुधाकर शिंदे यांच्या हस्ते बाळासाहेब च्या प्रतिमेचे पूजन करून व फटाक्याची आतिषबाजी करून जयंती मोठ्या धूम धडाक्यात साजरी झाली व शिव भोजन संचालक डॉ दिगंबर खुरस डे यांचे शहर प्रमुख अजय ढोणे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला नंतर संभाजी चौक येथे लाऊड स्पीकर,

पोवाडे गीते लावून कोरोना चे भान व नियम मध्ये ठेवून तिथे पण बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पाडून गुरुवार पेठ येथे सुद्धा शांततेत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पेढे वाटून जयंती मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरी करण्यात आली व कानोबा चौक येथे सर्व महिलांनी रांगोळी दिवे लावून फटाक्याची आतिश बाजी करून दिवाळी सारखी बाळासाहेब यांची जयंती साजरी केली.

सिदाजी वेटाळ येथे ज्येष्ठ नागरिक बळीराम जी हाडके व दिगंबर ढोणे आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात बाळासाहेबांचे पूजन करून शाखा प्रमुख प्रमोद हाडके यांच्याकडून चहा-नाश्ता वाटप करण्यात आला व त्यानंतर गुजरी लाईन व खाटीक पुरा येथे पण कोरोना चे नियम व शिस्त पाळून मोठ्या दिमाखात व उत्साहात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून दिपक भाऊ देवकर यांचे आयोजक च्या वतीने सत्कार करण्यात आला.

समारोपीय कार्यक्रम खडकेश्वर येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लहान मुलांना व विद्यार्थी-विद्यार्थिनींना लेटर व पेन मोठ्या प्रमाणात वाटप करून जयंती साजरी करण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचे आनंदाचे वातावरण दिसले येथे शिवसेना नेते गजानन पोपलघट आपल्या भाषणातून बोलताना सांगितले की लहान मुलांना बाळासाहेबांचं महत्त्व समजावून सांगितले,

तसेच शहर प्रमुख अजय ढोणे यांनी प्रत्येक घरा घरा पर्यंत बाळासाहेबांचे विचार हे शिवसैनिक पोहोचतील आणि पुढच्या वर्षी बाळासाहेब ठाकरे जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येईल असे आव्हान केले.

कार्यक्रमाला आवर्जून युवा सेना तालुका प्रमुख सागर रामेकार उप शहर प्रमुख निरंजन बँड, शंकर देशमुख ,गजानन पोपळघट ,डॉक्टर दिगंबर खुरसडे दीपक देवकर ,कैलास बगाडे सरपंच अर्चना ताई शिंदे, परशराम उंबरकार, सचिन गिरे, आनंद तायडे ,विश्वनाथ इंगळे, गणेश बुलबुले ,विनोद बोंबटकार ,सुमित हाडके ,गजानन हाडके,

सचिन तायडे ,प्रमोद हाडके, किशोर फुलारी ,संतोष राऊत, किशोर बोंबटकार, सचिन फुलारी ,संतोष राऊत, विजय देवकर, अनिल निमकडे ,काळपांडे, सुधाकर शिंदे विशाल गोतरकर,अरविंद गोत्रकर,सुनील गावंडे ,बंडू वालोकर, अब्दुल मुक्तार ,गणेश राहुलकर चेतन खोकले बाबू देवकर ,राखुंडे सर शिवसैनिक व आजी-माजी पदाधिकारी हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here