वाहनात असलेल्या बैलांना किरकोळ जखमा…खैरी बिजेवाडा जवळील रेल्वे क्रॉसिंगवरील घटना
रामटेक -: ( तालुका प्रतिनिधी )
रामटेक मनसर मार्गावरील वाहीटोला जवळील खैरी बीजेवाडा मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर असलेल्या लोखंडी बार वर जोरदार धडक देऊन जनावराची अवैध वाहतूक करणारी गाडी पलटली.
सविस्तर माहिती अशी की दिनांक ३ जानेवारी २०२२ ला सकाळी ५ सुमारास रामटेक वरून मनसरला जाणाऱ्या स्कार्पिओ क्रमांक MH-32-C0392 क्रमांकाची गाडी रेल्वे क्रॉसिंगवर जोराने धडक दिली व धडक दिल्यामुळे गाडीही पलटली यात अवैधरित्या दोन बैलांची क्रूरपणे दोन्ही पायाला व मानेला दोरीने बांधून ठेवले होते. अपघातामुळे मुळे दोन्ही बाजूने वाहतूक बंद झाली होती.
गावकऱ्यांच्या साहाय्याने दोन्ही बैलाचे दोरी तोडून बाहेर काढण्यात आले. मार्गावरील पोलिसांना आतील अवैध जनावर दिसू नये या करीता दोन्ही गाडीचा भागाला प्लायवूड लावलेले होते. गावातील अंकित यादव, महिपाल साखरे, बल्लू दर्भे, सुनील दाते, उत्तम पंधरा म, अरुण खंगार, बापू परतेती, सुनील गाते, मोनु रघुवंशी आदी लोकांनी प्रयत्न करून गाडीतील बैलाला बाहेर काढून गाडी बाजूला केली व वाहतूक सुरळीत केले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपी अद्याप फरार आहे. पुढील तपास रामटेक पोलीस करित आहे.
गाडीच्या अपघातामुळे दोन मुक्या प्राण्यांचे जीव वाचले जर हा अपघात घडला नसता तर दोन मुक्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला असता परिसरातील नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे या भागातून रात्रीच्या वेळेस नेहमी अवैध वाहतूक असते. स्थानिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार लक्षात येत नाही.