पातूर – निशांत गवई
पातूर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येथ असलेल्या निंबाच्या झाडाची कत्तल करून अवैध वाहतूक करताना सोमवारी २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४वाजता सुमारास आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सतिष नालिंदे यांनी लाकडासह वाहन जप्त केले आहे.
चान्नी येथे बसस्थानकावर निंबाच्या झाडाची कत्तल करून वन विभागाकडून परवानगी न घेता तसेच वाहतूक अवैध करताना आलेगाव वन विभागाने रंगेहाथ पकडले असता निंबाची झाडाची कत्तल सोमवारी सकाळपासून सुरू होती.

याबाबत काही गावातील ग्रामस्थांनी विचारपूस केली असता त्याला ग्रामपंचायतीने सुद्धा पूर्वी परवानगी दिली होती.परंतु वनविभागाकडून वाहतूक करण्यासाठी परवाणगी नसल्याने वन विभागाने सदर वाहन लाकडा सह जप्त केले आहे.वनविभागाच्या आर्शीर्वादाने या परिसरातील वृक्षांची अवैध कत्तल सुरू आहे.
आलेगाव वन परिक्षेत्र अधिकारी व वृक्ष माफीया यांची मिलीभगत असल्याने वनविभागाकडून कुठल्याही प्रकारची परवानगी न काढता तसेच वृक्षांची कत्तल अवैध वाहतूक सुरू आहे.शासन कोट्यवधी रूपये खर्च करून वृक्षांची लागवड करीत असता काही लोक वृक्षतोड करीत आहेत.