राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वासू पाटील

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार बंड यांनी दिले नियुक्तीपत्र

मुंबई : चित्रपटसृष्टीतील पुरस्कार विजेते कला दिग्दर्शक आणि अष्टपैलू कलाकार वासू पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार बंड यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीपत्र दिले. श्री. बंड, लक्ष्मीकांत खाबिया, खासदार श्रीनिवास पाटील यांच्या सहकार्याने ही जबाबदारी वासू पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


ग्रामीण भागात अतिशय कष्टात बालपण गेलेल्या वासू पाटील यांनी चित्रकलेत प्राविण्य मिळवले. अनेक चित्रकला आणि रांगोळी स्पर्धा गाजवत त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. अनेक चित्रपटांचे उत्कृष्ट कलादिग्दर्शक केले. या क्षेत्रातील मानाचे अनेक पुरस्कार त्यांनी मिळवले. चित्रपट क्षेत्रातील कलाकारांच्या प्रश्नांचाही त्यांचा सखोल अभ्यास आहे. त्यांच्या निवडीमुळे संघटनेला अतिशय कर्तबगार असे पदाधिकारी लाभल्याची प्रतिक्रिया कलाकारांमधून व्यक्त होत आहे.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टीला मोठे नुकसान सोसावे लागले. अनेक निर्मात्यांना मोठा फटका बसला तर सामान्य कलाकार तंत्रज्ञ यांच्याही पोटाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. आदरणीय शरद पवारसाहेब, उपमुख्यमंत्री अजित पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्वांचे योग्य रीतीने लवकरात लवकर पुनर्वसन कसे करता येईल,

यासंदर्भात तातडीने संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर बोलताना वासू पाटील यांनी सांगितले. या निवडीबद्दल मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here