Saturday, April 20, 2024
Homeराज्यवसंतराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातूरचा १०० टक्के निकाल…

वसंतराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातूरचा १०० टक्के निकाल…

Share

गत दहा वर्षापासून सलग शंभर टक्के निकालाची परंपरा कायम…

पातुर – निशांत गवई

नुकतेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेचा वर्ग १२ वीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला असून यामध्ये वसंतराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातुरचा १०० टक्के निकाल लागला आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाने गत दहा वर्षापासून शंभर टक्के निकालाची चालत आलेली परंपरा या वर्षी सुद्धा कायम राखली आहे.

वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयात यावर्षी विज्ञान शाखेमध्ये एकूण ६२ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते,त्यामधून सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या कनिष्ठ महाविद्यालयातून कु.साक्षी वामन निमकंडे हिने ८७.८३ % गुण मिळवून कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला ,तसेच सनी ज्ञानेश्वर गाडगे याने ८७.००% गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला,

कु. स्नेहल रवींद्र बगाडे हिने ८१.८३ % गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला. कु. मंगला समाधान काकड ८१.१७ % कु.शिवानी मंगेश गिर्हे ८०.०० % आदी विद्यार्थ्यांसह कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण १६ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले तर ४० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले व ०६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संस्थापक /सचिव मा. रामसिंगजी जाधव साहेब तसेच प्राचार्य , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: