वंचित बहुजन आघाडी मुर्तिजापुर तालुक्याच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन…

संजय गाधी, श्रावण बाळ, ईंदीरा गांधी व ईतर सर्व योजनेचे अनुदान दिवाळी आधी मिळणार का याकडे लागले सर्वांचे लक्ष…

मुर्तिजापुर – वंचीत बहुजन आघाडी मुर्तिजापुर तालुक्याच्या वतीने तहसिलदार साहेब मुर्तिजापुर यांना दिनांक – १२ नोव्हेबर रोजी निवेदन देण्यात आले यामध्ये (१)संजय गांधी योजना एस. सी, एस.टी (२) श्रावन बाळ योजना (३) ईदीरा गांधी योजना‌ (वृध्दापकाळ योजना). (४) ई.गा.यो.(अपंग योजना)

(५) ई.गा.योजना (विधवा योजना ) (६) राष्ट्रीय कुटुंब अर्थसाह्य योजना या सर्व प्रकारच्या शासकीय योजनेचे लाभार्थी तालुकास्तरावर खुप मोठ्या प्रमाणात असुन दोन दिवसावर दिवाळी सन येनार आहे. अशा वेळेस वयोवृध्द , अंपग , विधवा , निराधार व ई. लोकांना शासनाच्या वरील योजनेचे अनुदान ‌‌‌‌‌‌लाभार्थ्याना मागील तिन महीन्यापासुन मिळालेले नसल्या मुळे तालुक्यातील लाभार्थ्यांनवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

प्रशासनाने आपल्या स्तरावुन चौकशी करुन संबधीत लाभार्थ्यांच्या बॅक खात्यात दिवाळी आगोदर शासकीय अनुदान जमा करावे अशी मागणी निवेदन देवुन वंचीत बहुजन आघाडी मुर्तिजापुर तालुक्याच्या वतीने करण्यात आली यावेळी निवेदन देतांना संजय नाईक (ता.अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी )

सचिन दिवनाले (ता.महासचिव वंचित बहुजन आघाडी )मोहन वसुकार (नगरसेवक) पंडीतराव वाघमारे (माजी जिल्हा सदस्य ) ,राजु पंडीत ,नवाब अली , मिंलीन्द डोगरे ,संतोष ईगळे ,मोहन आमटे ,शॉन्टी बरडे ,भास्कर ठाकरे ई उपस्थीत होते.

सर्व शासकीय योजनेचे अनुदान दिवाळी आधी लाभार्थ्यांनच्या खात्यावर जमा करा अन्यथा आंदोलनाचा पवित्रा हाती घ्यावा लागेल – संजय नाईक ( वंचीत बहुजन आघडी ता. अध्यक्ष मुर्तिजापुर )

मुर्तिजापुर तालुक्यातील बरेच लाभार्थी त्या अनुदानावर अवलबुन आहे . तरी प्रशासनाने त्यांचा अंत न पाहता अनुदान दिवाळीच्या आत जमा करुन त्या लाभार्थ्याची दिवाळी साजरी होणार करीता अनुदान लवकर जमा करावे – सचिन दिवनाले (ता.महासचिव वंचित बहुजन आघाडी )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here