एस.टी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी वैशालीताई समर्थकांनी गणेशाला आणि केंग्णेश्वरी देवीला घाटले साकडे…

सांगली – ज्योती मोरे

वैशालीताई पाटील समर्थकांनी एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.प्रत्येक संप किंवा आंदोलनास त्यांचा जाहिर पाठिंबा असतो.आज २० दिवस झाले एस.टी कर्मचारी यांचा संप चालू आहे.या संपाला वेगळेच वळण लागलेले आहे,कारण एस.टी कर्मचारी एकच निर्णयावर ठाम आहेत.

की राज्य परिवहन महामंडळ चे राज्य शासनामध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी त्यांनी हा संप केला आहे.दिवाळी ला एस.टी कर्मचाऱ्यांना फक्त २००० हजार बोनस दिला गेला पगार तर ८००० हजार आहे.यामध्ये कौटुंबिक खर्च,मुलांचे शिक्षण हे भागत नसल्याने राज्य शासनामध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन लढा चालू केला आहे.

या लढ्याला आज २० दिवस झाले पण राज्य सरकार ने आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी कोणताही तोडगा काढलेला नाही.झोपलेल्या सरकार ला आणि परिवहनमंत्री यांना जाग यावी आणि एस.टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकर मार्गी लागावेत यासाठी वैशालीताई पाटील समर्थकांनी आज सांगली येथील गणेश मंदीर मध्ये श्री गणेशाला आणि श्री केंग्णेश्वरी देवीला साकडे घातले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here