दानापूर पशुवैद्यकीय दवाखाना येथे जनावरांना गोर पॉक्स लसीकरण…

दानापूर – गोपाल विरघट

पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या गावातील जनावरामध्ये लंपी स्कीन सदृश्य लक्षणे आढळत असल्यामुळे प्रतिबंधत्माक उपाय म्हणून जनावरांना गोर पॉक्स लसीचे लसीकरण करण्यात आले.

कोरोणा संक्रमन वाढत असल्यामुळे लसीकरणाच्या वेळी कोणतीही गर्दी होऊ नये तसेच पशुपालकामध्ये फिजीकल डिस्टन्स राहण्याच्या दृष्टीकोणातुन गावामध्ये वार्डनिहाय लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते,

या वेळी गावातील पशुपालकांनी कोरोना संक्रमनाचा धोका लक्षात घेता तोंडाला माक्स कींवा रूमाल बांधुुनच आपल्या जनावरांना लसीकरणासाठी आणले लससीकरण मोहीमेत डॉ. किशोर पुंडकर,

यांच्या मार्गदर्शनात डॉ. चांदुरकर, डॉ. वहिले, डॉ.सुशिर, डॉ.बुरघाटे, व परिचर मेश्राम यांनी परिश्रम घेतले,आजारि जनावरे औषधोपचार नंतर बहुतांश जनावरे बरि झाल्याची माहिती दानापूर पशुवैद्यकीय अधिकारि डॉ. किशोर पुंडकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here