खंडाळा मकरध्वज येथील लसीकरण संपन्न…

चिखली – दीपक साळवे

संपूर्ण देशात कोरोना ची लाट ओसरत असताना लसीकरणाला प्राधान्यक्रम देऊन चिखली पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मौजे खंडाळा मकरध्वज येथे लसीकरणाला सुरुवात करण्यात आली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र एकलारा व ग्रामपंचायत कार्यालय खंडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिबंधात्मक लसीकरण यशस्वी संपन्न झाले.

यावेळी गावात 45 वर्षाच्या पुढील शंभर नागरिकांना लसीकरण देऊन यानुसार आपल्या कार्याचा शुभारंभ खंडाळा मकरध्वज चे सरपंच भारत पानझाडे सचिव माने मॅडम तलाठी शेजवळ मॅडम गणेश ठेग प्रकाश ठेगहे उपस्थित होते.

यावेळी शासकीय नियमानुसार सामाजिक अंतर ठेवून पोलीस बंदोबस्तात लसीकरण संपन्न झाले व यानंतर येणार्‍या लसीकरणाच्या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून राष्ट्रीय कर्तव्य समजून पार पाडावे असे आवाहन यावेळी सरपंच श्री भारत पानझाडे यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here