दिव्यांग नागरिकांचे लसिकरण मोहीम सुरुवात…

न्युज डेस्क – मा. पालकमंत्री महोदय अकोला यांचे निर्देशानुसार नगर पालिका क्षेत्रातील 45 वर्षा वरील दिव्यांग नागरिकाचे लसिकरण सात दिवसांचे आत पूर्ण करावयाचे असून तसे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले त्यानुसार मूर्तिजापुर नगर पालिका क्षेत्रातील नोंदणी केलेल्या 45 वर्षा वरील एकूण 174 दिव्यांग नागरिकाचे लसिकरण मोहीम सुरवात करण्यात आली असून राजु देवीदास गावंडे दिव्यांग नागरिक यांनी लसिकरण करुण घेऊन सर्व दिव्यांग यांनी लस घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले,

सदर दिव्यांग नागरिकाचे लसिकरण लवकरात पूर्ण होण्या साठी दिव्यांग नागरिकांनी आपले आधार कार्ड घेऊन नगर पालिका लसिकरण केंद्रावर उपस्थित राहून आपले लसिकरण करुण घ्यावे असे आवाहन अभयसिंह मोहिते उपविभागीय अधिकारी, विजय लोहकरे मुख्याधिकारी, डॉ. विलास सोनवणे वैधकीय अधीक्षक,

डॉ. राजेन्द्र नेमाड़े, विजय वाडेकर नोडल अधिकारी लदेसा. रुग्णालय मूर्तिजापुर , यांनी केले, लवकरच 18 वर्षा वरील दिव्यांग नागरिकाचे लसिकरण सुरु करण्यात येईल अशी माहिती या वेळी लसिकरण विभागाचे नोडल अधिकारी यांनी यावेळी दिली.

या बाबत अधिक माहिती साठी नगर परिषद दिव्यांग विभागाचे नोडल अधिकारी राजेश भुगुल यांचे सोबत संपर्क साधावा असे मुख्याधिकारी यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ निशांत प्रधान, हेमंत तायड़े, विनोद चव्हाण, सचिन पाटिल, पूजा वाघ कर्मचारी वर्ग लदेसा. रुग्णालय यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here