अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन एअरफोर्स वन ची शिडी चढताना तोल गेला…आणि स्वतःला सावरलं…

न्यूज डेस्क- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन एअरफोर्स वन ची शिडी चढताना तीनदा पडले, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतेय. तर नेतकरी यावर प्रतिक्रियांचा पाउस पाडीत आहे. मात्र एअरफोर्स वन या विशेष विमानाची शिडी चढताना तीन वेळेस पडल्यावरही बायडेन यांनी स्वतःला सावरलं आणि सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.

दरम्यान, तीन वेळेस पडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बायडेन यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती, त्यावर व्हाइट हाउसने बायडेन पूर्णपणे स्वस्थ असल्याचं सांगितलं आहे.

जो बायडेन शुक्रवारी आशियाई-अमेरिकी समुदायाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी अटलांटाच्या दौऱ्यावर निघाले होते. अटलांटा जाण्यासाठी ते एअरफोर्स वन या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांसाठी असलेल्या विशेष विमानाची शिडी चढत होते. चार-पाच पायऱ्या चढल्यावर मात्र अचानक त्यांचा तोल गेला आणि ते पायऱ्यांवरच पडले, बरं एकदा नाही तर त्यानंतर पुन्हा दोन वेळेस चढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण दोन्हीवेळेस ते पडले. असा प्रकार त्यांच्यासोबत तीन वेळेस झाला.

पहिले दोन वेळेस त्यांनी हाताचा आधार घेत स्वतःला सावरलं, पण तिसऱ्यांदा ते गुडघ्यावर पडले. तिसऱ्यांदा पडल्यानंतर मात्र त्यांनी स्वतःला सावरलं आणि दोन्ही हातांनी साइड रेलिंगचा आधार घेत ते विमानाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले.

विमानाच्या प्रवेशद्वाराजवळ सॅल्यूट ठोकून ते विमानात बसण्यासाठी निघून गेले. दरम्यान, या घटनेनंतर जो बायडेन यांची प्रकृती १०० टक्के ठिक आहे अशी माहिती व्हाइट हाउसकडून माध्यमांना देण्यात आली आहे. ‘बायडेन शिडी चढत होते त्यावेळी खूप जोरात वारा सुरू होता, त्यामुळे त्यांचा तोल गेला असावा. पण ते पूर्णतः स्वस्थ असून १०० टक्के ठिक आहेत’, असं व्हाइट हाउसकडून सांगण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here