उरळ पोलिसांच्या कारवाईत अवैध विदेशी दारू जप्त…

अकोला – अमोल साबळे

अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गायगाव मोरगाव मार्गावर उरळ पोलिसांनी नाकाबंदी करत विदेशी दारू च्या 48 अवैद्य बाटल्या हस्तगत केल्या आहेत. उरळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनंतराव वडतकर यांनी मागील काही दिवसापासून उरळ हद्दीत अवैद्य धंद्यांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. बेकायदेशीर दारू, वरली मटका, जुगार या अवैध धंद्यांवर धडाकेबाज कारवाई होत आहेत. परिणामी या कारवाईचा चांगला धसका अवैघ व्यवसायिक यांनी घेतला आहे.

शुक्रवार देखील गायगाव मोरगाव – गायगाव मार्गावर कारवाई करत विदेशी दारूच्या ४८ अवैद्य बाटल्या हस्तगत केले आहे. आरोपी शेख अन्सार शेख बहार राहणार गायगाव हा मोरगाव भाकरे रस्त्यावरून गायगाव कडे येत असताना धनपाल लाटकर शैलेश घुगे या पोलीस कर्मचाऱ्यांनी रंगेहात अटक केली त्याच्याजवळून विदेशी दारूच्या ४८ बाटल्या जप्त करण्यात आल्या असून बाटलीची किंमत ७००० हजार ६८० रुपये एवढी आहे. ही कारवाई ठाणेदार अनंतराव वडतकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. आरोपी विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here