UPSC: इंडियन इकोनॉमिक सर्विस आणि इंडियन स्टैटिस्टिकल सर्विसच्या मुलाखत मध्ये बदल… वाचा सविस्तर…

न्युज डेस्क :- कोरोनाव्हायरसचा सर्वत्र उद्रेक झाल्यामुळे इंडियन इकोनॉमिक सर्विस (IES), इंडियन स्टैटिस्टिकल सर्विस (ISS) परीक्षा २०२० ची परीक्षा २० एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान घेण्यात येणार होती. युनियन लोकसेवा आयोगाने (UPSC) यासंदर्भात अधिसूचित केले आहे की २० एप्रिल आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व भरतींच्या व्यक्तिमत्त्व चाचणी (पर्सनॅलिटी टेस्ट) पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

यूपीएससीने म्हटले आहे की, “आयईएस-आयएसएस परीक्षा २०२० ची पर्सनॅलिटी टेस्ट-मुलाखत (२० एप्रिल ते २३ एप्रिल २०२१) पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन तारखांची घोषणा योग्य वेळी केली जाईल.” इंडियन इकोनॉमिक सर्विस (IES) करिता एकूण ३१ उमेदवार तर इंडियन स्टैटिस्टिकल सर्विस (ISS) साठी एकूण १३१ उमेदवारांची निवड करण्यात आली होती.

युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने (UPSC) इंडियन इकोनॉमिक सर्विस (IES) / इंडियन स्टैटिस्टिकल सर्विस (ISS) २०२१ साठी आधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार यूपीएससी आयईएस, आयएसएस २०२१ परीक्षेसाठी२७ एप्रिल २०२१ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. यूपीएससी आयईएस (IES) परीक्षा १६ जुलै २०२१ (शुक्रवार) रोजी घेण्यात येणार असून, ही परीक्षा तीन दिवस चालू राहिल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here