चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी स्नेहा जगताप यांची बिनविरोध निवड…

राजगुरूनगर ( पुणे ) : चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या स्नेहा नितीन जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.मावळते नगराध्यक्ष शेखर घोगरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी स्नेहा जगताप यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

चाकण नगरपरिषदेचा पंचवार्षिक कालावधी संपत आला आहे.त्यामुळे जगताप यांना फक्त दोन महिन्यांचा कालावधीत काम करण्याची संधी मिळणार आहे.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी संजय तेली,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी दिली आहे.निवडणूक कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंग पाळून पार पडला.

नगरपरिषदेच्या चालू पंचवार्षिक कालावधीत शिवसेनेने तीन जणांना नगराध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षाचे भूमिका बजावत आहे.तर भाजपचा एक नगरसेवक आहे.यावेळी उपनगराध्यक्ष ऋषीकेश झगडे,नगरसेवक राजेंद्र गोरे,निलेश गोरे,प्रकाश गोरे,मंगल गोरे,सुजाता मंडलिक,हुमा शेख,धीरज मुटके हे उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी या निवडणूकीकडे पाठ फिरवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here