केंद्रीय मंत्री स्मृती इराणी स्कूटीवर…

न्युज डेस्क – पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवाहातील नेते सक्रीय झाले असून नेत्यांचे वेगवगळे राजकीय स्टंट समोर येत आहेत. शुक्रवारी पक्षाच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी येथे रोड शो दरम्यान स्कुटी चालवतांना दिसल्याने त्या पेट्रोल दरवाढीचे समर्थन तर करीत नाही ना? असा प्रश्न पडला आहे.

दोन दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या वाढत्या पेट्रोल,डिझेलच्या निषेधार्थ आपल्या कार्यालयात स्कूटर ने प्रवास केला होता तर आज केंद्रीय मंत्री स्मृती इराणी येथे कार्यकर्त्यांसोबत स्कूटी चालवितांना दिसल्यात. परंतु फरक इतका आहे की ममता इंधन दराच्या वाढीच्या निषेधार्थ इलेक्ट्रिक स्कूटरवर चालताना दिसल्यात स्मृती इराणी पाचपोट्यातील कार्यकर्त्यांच्या सोबत पेट्रोलची स्कूटर चालवताना दिसल्यात. यापूर्वी त्यांनी 24 परगणा या भागात रोड शो देखील केला होता.

स्मृतींनी येथे ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला केला आणि पाचपोटा येथे तिने वृत्तसंस्थेतील एएनआयला (ANI) सांगितले की, ‘बंगालमधील मोठ्या संख्येने लोक पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मेळाव्यात किंवा इतर कार्यक्रमांमध्ये सामील होत आहेत याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. हे सूचित करते की या वेळी बंगालमध्ये प्रथमच आपल्याला कमळ फुलताना दिसेल.

त्या म्हणाल्या की ममता बॅनर्जी यांच्या सत्तेत हिंसाचार चालला आहे आणि बंगालची लोकशाही आवाज निर्णय घेईल की टीएमसी या निवडणुकीत हरवेल. पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मेपूर्वी विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोग शुक्रवारी संध्याकाळी निवडणुकीच्या तारखांची घोषणा करणार आहे. पश्चिम बंगालमधील २९४ विधानसभा जागांवर निवडणुका होणार आहेत. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसच्या सत्तेवर पूर्णपणे अतिक्रमण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here