शनिवार दि १४ मे रोजी केंद्रीय मंत्री ना रामदासजी आठवले तासगाव दौऱ्यावर, तासगावात गूळ पावडर कारखान्याचे भूमिपूजन करणार…

सांगली – ज्योती मोरे.

सांगली जिल्ह्याचे सुपुत्र केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना डॉ रामदासजी आठवले शनिवार दि 14 मे रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून सायंकाळी ते तासगाव तालुक्यातील खा. रामदासजी आठवले शेतकरी सहकारी गूळ प्रोसेस कारखाना लि. बेंद्री तासगाव या कारखान्याचे भूमी पूजन करणार आहेत.

याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंधारण मंत्री ना जयंतराव पाटील, राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार असल्याची माहिती रिपाईचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष तथा कारखान्याचे चेअरमन संदेशभाऊ भंडारे यांनी दिली.

केंद्रीय मंत्री ना डॉ रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनातून गूळ पावडर कारखान्याची उभारणी केली असून तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व बेरोजगार युवकांना काम मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काम केले जाईल, असे संदेशभाऊ भंडारे म्हणाले.

जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर यांच्या लग्न सोहळ्यात ना डॉ आठवले उपस्थित राहणार असून त्यानंतर सायंकाळी 7:30 वाजता बेंद्री तासगाव येथे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंधारण मंत्री ना जयंतराव पाटील, राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम, सदाभाऊ खोत, आमदार सुमनताई पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार अरुणअण्णा लाड, आमदार अनिलभाऊ बाबर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आमदार मानसिंह नाईक,

आमदार विक्रम सावंत, आमदार गोपीचंद पडळकर, रिपाईचे ईशान्य भारत प्रभारी विनोदभाऊ निकाळजे, माजी मंत्री अजितराव घोरपडे, यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पायाभरणी भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील विविध पदाधिकारी उपस्थित राहणार असून तालुक्यातील शेतकरी व बेरोजगार युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रिपाईचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष तथा कारखान्याचे चेअरमन संदेशभाऊ भंडारे यांनी केले, रिपाईचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष तथा कारखान्याचे चेअरमन संदेशभाऊ भंडारे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here