खा.सुधाकर श्रृंगारे यांना युनिसेफ इंडियाचा “संसदीय ग्रुप फॉर चिल्ड्रन पुरस्कार” !

अहमदपूर – बालाजी तोरणे

संसदेत मुलींच्या कल्याणासाठी आवश्यक विधेयक प्रस्तुत करणे आणि बाल सुरक्षा,असुरक्षित मुलांचे संरक्षण आणि शालेय शिक्षण संदर्भात प्रश्न उपस्थित करुन पाठपुरावा करुन संसदेच्या २०१९- २० या सञात विषय मांडले त्याची दखल युनिसेफ इंडियाने घेऊन खासदार सुधाकर श्रृंगारे यांना “संसदीय ग्रुप फॉर चिल्ड्रन”हा पुरस्कार दिला आहे.

सदरील पुरस्कार देशातील ९ खासदारांना जाहीर झाला असून महाराष्ट्रात भाजपचे २ तर अन्य १ अशा ३ खासदारांना देण्यात आला आहे.त्यात लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांचा समावेश आहे.युनिसेफ इंडियाने देशातील ९ खासदारांमध्ये राज्यसभा खासदार संजय सिंग,केरळचे के के राजेश,

ञिपुराचे झरणा दास,राजस्थानचे जसकौर मीना,अंदमान आणि निकोबारचे कुलदीप राय शर्मा,जम्मूचे जुगल किशोर शर्मा,महाराष्ट्राचे हीना गावीत,अरविंद सावंत यांचा समावेश आहे.युनिसेफ इंडियाचा संसदीय ग्रुप फॉर चिल्ड्रन पुरस्कार मिळाल्याने खासदार सुधाकर श्रृंगारे यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here