Ad
Home राज्य

चार जणांची क्षमता असणा-या नावेत ११ प्रवासी बसल्यामुळे हि दुर्दैवी घटना घडली…

Ad

आजपासून आठ बेपत्ता जणांचा पुन्हा शोध सुरु…

नरखेड – अतुल दंढारे मेंढला

आज १५ सप्टेंबर ला पुन्हा एन डि आर एफ व एस डी आर एफ व आपत्ती व्यवस्थापन कमांडो सकाळी ७ वाजतापासुन उर्वरित आठ जणाचा शोध घेत आहे चार जणांची क्षमता असणा-या नावेत ११ प्रवासी बसल्यामुळे हि दुर्दैवी घटना घडली झुंज वघाळ येथे वर्धा नदीमध्ये मृत्यू झाल्याचे कळताच आमदार देवेन्द्र भुयार, खासदार रामदास तडस,माजी क्रुषीमंञी डाॅ अनिल बोंडे,

Ad

माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, अमरावतीच्या जिल्हाधिकारी सौ पवनीत कौर, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन तसेच NDRF,SDRF व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चे कमांडो यांनी शोधकार्य चालू केले 3 मृतदेहाचा शोध लागला असून यंत्रणा अधिक तपास घेत आहे.

एकुण १३ जण नावेत बसले होते त्यापैकी दोन जण वाचले, तिघाचे प्रेत कालच सापडले पण अजूनही हि आठ जणाचे प्रेत मिळू शकले नाही २०जणाची रेस्क्यु टीम तपास कार्य करीत आहे, काय,कधी होईल, हे सागंताच येत नाही, व अशा धक्कादायक घटना घडत असतात गाडेगाव येथून दोन किमी.अतरावर असलेल्या झुंज तीर्थक्षेत्र (वघाळ) येथे घडलेलीदुर्दैवी घटनची कहानी गाडेगाव येथील श्री गणेश मटरे यांच्या मुलगा रवी मटरे याचं दुःख निधन झालं.

या मुलांच्या दशक्रिया करीता पाहुणे आले होते. दिनांक १३/९/२०२१ रोजी दशक्रियेचा कार्यक्रम झाला.व दिनांक १४/९/२०२१ ला वर्धा नदी चा धबधबा व झुंज तीर्थक्षेत्र (वघाळ) पाहण्यासाठी १४ तारखेला सकाळी नऊच्या दरम्यान गेले होते. वर्धा नदीत पाणी भरपूर असल्याने मासे पकडणाऱ्याचे डोंगे (नाव) होते.

सदर नावे मधे मटरे परीवारातील लहान मुले व महीला व पुरुष असे एकूण तेरा जण बसून नावविहार करीत असताना नाव पलटली. वर्धा नदीत पाणी भरपूर असल्याने पोहता न आल्याने सर्व अकरा ही व्यक्ती चा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये दोन, वर्षांचे बाळपण होते अत्यंत मन हिलावून टाकणारी घटना आहे

सर्वप्रथम घटनास्थळी ठाणेदार मिलिंद सरकटे , नरखेड तालुक्यातील जलालखेडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार हरीशचंद गावडे ,पोलीस कर्मचारी व तलाठी एस के गोलवाल पोहोचले होते नंतर इतर अधिकारी, व नेतेमंडळी पोहोचली होती दुपारपासुन संध्याकाळ पर्यत व्रुत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले होते देशातील सर्वच मोठ्या व्रुत्तवाहिन्यांनी या घटनेची दखल घेतली होती.

आज सर्वच वर्तमानपत्रात सदर घटनेची बातमी प्रथम पानावर प्रकाशित झाली आहे कुटुंबातील प्रमुखानेच नाव चालविण्याचा प्रयत्न केला त्यांनी इतरांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केले पण अखेर ते पण स्वतः चे प्राण वाचवू शकले नाही नुकतेच लग्न झालेले जोडपे यमसदनी नावेत प्रवास करणाऱ्यामध्ये २२दिवसापुर्वी विवाहबंधनात अडकलेल्या अतुल गणेश वाघमारे,व व्रुषाली अतुल वाघमारे या दाम्पत्याचा समावेश आहे. २२ सप्टेंबरला त्याचे लग्न झाले होते हे विशेष.

Ad

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here