धारणी बलात्कारप्रकरणी पोलिसांचा अक्षम्य हलगर्जीपणा…चित्रा वाघ.

संबधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी.

न्युज डेस्क – ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा धारणी पोलिसांना विसर पडला असून ‪धारणी बलात्काराचे प्रकरण‬ ‘सामूहिक’ असतांना चुकीची कलमे लावण्यात आली. शिवाय पीडित ‪महिला दलित असतानाही ॲट्रोसिटीचे कलम लावले गेले नाही. ‬

या ‪गंभीर प्रकरणात पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला असून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करा’, अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.

संवेदनशील प्रकरणात पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असून आरोपींना वाचवण्याचा पोलीस करत आहेत. त्यामुळे ‪धारणी पोलीस निरीक्षक मोहन डुले, तपास अधिकारी, कान्होपात्रा, उपनिरीक्षक आकाश महल्ले यांना तात्काळ बडतर्फ करा मागणी करत वाघ पुणे म्हणाल्या,

‘‪धारणी सामूहिक बलात्कार प्रकरणात ‪सगळ्यात संतापजनक बाब‬ म्हणजे अत्यवस्थ पिडीतेला पोलिसांनी घरी सोडायला हवे होते. पण त्यांनी तिला घरी न सोडता ‘आमच्याकडे पीडितेला घरी सोडायचा नियम नाही’, असे धक्कादायक उत्तर ‪उपनिरीक्षक महल्ले ‬यांनी दिले हि संवेदनशीलता आहे का पोलिस दलाची? महल्ले यांचे वर्तन खाकीला काळीमा फासणारे आहे.’

‬धारणीतील गंभीर प्रकाराची दखल राज्याच्या पोलीस महासंचालकांनी तात्काळ घ्यावी, बेजबाबदार वर्तन आणि हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आहे, असेही वाघ म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here