उदयसिंह यादव यांच्या नेतृत्वाने गावची लाडली तनू जाणार सासरी, नाना पटोले यांची राहणार उपस्थिती…

रामटेक – राजु कापसे

मुलींच्या जीवनातील आनंदाचा क्षण कोणता असेल तर तो म्हणजे विवाहाचा क्षण होय. मात्र, आई- वडील तसेच बहिण-भावाचे छत्र नसणाऱ्या मुलीच्या मनात कोणते विचार येत असतील याची कल्पनाच करणे शक्य नाही, हे तितकेच खरे.

असाच काहीसा प्रकार रामटेक तालुक्यातील मसला येथील तनू मलेवार या मुलीला मातोश्री काशीदेवी संस्थेचे सचिव अध्यक्ष उदयसिंग उर्फ गज्जू यादव यांच्या दातृत्वामुळे गावची लाडली तनू रविवारी (२३ जानेवारी) खुशी खुशी सासरी जाणार आहे. यावेळी आशीर्वाद देण्याकरिता महाराष्ट्र काँग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहे.

तनू लहान असतानांच तिचे वडील तिला व आईला सोडून कुठेतरी निघून गेले. यानंतर आई कष्टाने तिचा सांभाळ करीत असतांना कोरोना महामारीने गेल्यावर्षी आईचे छत्रही हिरावून नेले. वडीलापाठोपाठ आईचे छत्र हिरावल्याने तसेच भाऊ-बहिण

नसणाऱ्या तनूची स्थिती आभाळ फाटल्यागत झाली होती. अशाप्रसंगी गज्जू यादव यांनी तिला तू एकटी नाही आम्ही तुझ्यासोबत आहोत, अशा शब्दात भक्कम आधार देत तिचे पालकत्व स्वीकारले. वयात आलेल्या तनूच्या लग्नाची सर्वांनाच काळजी होती. अशात भंडारा जिल्ह्यातील कांद्री येथील कुणाल बारई यांनी तिचा हात मागितला.

निराधार तनूच्या लग्नाच्या खर्चाचा प्रश्न उभा टाकला असता लग्नाचा संपूर्ण खर्च गज्जू यादव व मित्र परिवार यांनी उचलल्यामुळे रविवारी श्री हनुमान मंदिर चौक, मसला येथे मोठ्या थाटामाटात विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गज्जू यादव यांच्या दातृत्वाबद्दल पंचक्रोशित कौतूक होत आहे.

आयोजनाकरिता मातोश्री काशीदेवी बहु. शिक्षण संस्था परसोडा (वाहिटोला) च्या उपाध्यक्ष मनीषा उदयसिंग यादव, मुख्याध्यापक नरेंद्र फाले, समस्त शिक्षक व शिककेतर कर्मचारी व मित्र परिवार सहकार्य करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here