बोदवड पंचायत समिती अंतर्गत रोजगार हमी विभागाच्या वैयक्तीक विहिरी कधी पूर्ण होणार…

बोदवड – गोपीचंद सुरवाडे

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरी सन 2016ते2017 पासून मंजुर असूनय विहिरींची कामे अद्याप पूर्ण झाले नाही लाभार्थी पंचायत समितीच्या पायऱ्या चढून थकून गेले आहेत, लाभार्थ्यांची कैफियत एकूण घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांना वेळ नाही,

ते लोकसेवेच्या नावाखाली ठेकेदारीत गुंग आहेत,याबाबत माहिती अशी की बोदवड तालुक्यात सन 2016-2017 पासून रोजगार हमी योजनेच्या वैयक्तिक सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत अजूनही यातील शेकडो विहिरी अपूर्ण आहेत,यासाठी लाभार्त्याना सारखे चकरा माराव्या लागत आहे,

रोजगार हमी च्या नाला खोलीकरण, गाळकाढणे,वृक्षारोपण ,तलाव दुरुस्ती,अशा कोट्यवधी रुपयांचे कामासाठी पंचायत समिती कडून निधी उपलब्ध करून दिला जातो, रोजगार सेवक,एपीओ,टिपीओ,हेसर्व यासाठी धावपळ करतात कारण ही कामे सभापती, सदस्य,किंवा अधिकारी सुद्धा यात भागीदार असतात,

त्यांचे हजेरीपट कुशल अकुशल बिले तात्काळ काढले जातात,या मध्ये रोजगार हमी असो किंवा स्वच्छ भारत मिशन असो,साडे तीन लाखाचे ते दहा लाखाचे बिल लगेच काढले जाते कारण त्या कामाचा ठेका सभापती सदस्य यांनी घेतलेला असतो,

परंतु बारा हजार रुपये च्या वैयक्तिक अनुदानासाठी बारा चकरा पंचायत समिती ला माराव्या लागतात,या वेळेस चौकीदार,हक्काचा माणूस, कोणीच मदतीला येत नाही,एक विहिरीसाठी तीन ते चार वर्षे लागत असतील तर जनतेच्या विकास कामा कडे पदाधिकाऱ्यांचे किती लक्ष आहे, “यालाच म्हणतात सबका साथ खुद्द का विकास!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here