कागलमध्ये सापडला बेवारस मृतदेह…

कोल्हापूर – राहुल मेस्त्री

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरानजीकच्या परिसरात एक बेवारस मृतदेह दि 20 नोव्हेंबर रोजी निदर्शनास आल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की चौगुले गल्ली, मुजावर पेठ कागल येथील रहिवासी विरकुमार बाळासाहेब पाटील हे आपल्या शेतात गेले असता.

कागलमधील मुरगुड नाका,शाहू साखर कारखाना फाटयाच्या समोर असलेल्या मोकळ्या शेतजमीनीमध्ये मृतदेह असल्याची शंका निर्माण झाल्याने सदर प्रकार त्यांनी कागल पोलीस ठाण्यात सांगितला यावेळी कागलचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक निखिल करचे यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत जाऊन घटना स्थळी दाखल झाले.

याठिकाणी पोलिस शोधमोहीम करत असताना पंचवीस ते तीस वयोगटातील एका तरुणाचा बेवारस मृतदेह सापडला.तर या मयत व्यक्तीची ओळख पटलेली नसुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निखिल करचे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here